audio
audioduration (s)
2.36
25.8
text
stringlengths
18
172
gender
class label
2 classes
त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली.
0female
राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, आपण कोण आहात.
0female
त्यावर त्या स्त्रीने सांगितले, मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.
0female
तेव्हा राजाने तिला सांगितले, तू जाऊ शकतेस.
0female
लक्ष्मी बाहेर पडली, नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले.
0female
त्याने उत्तर दिले, माझे नाव दान आहे.
0female
लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.
0female
राजाने सांगितले आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.
0female
त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला.
0female
त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला.
0female
तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले.
0female
तो पुरुष म्हणाला, माझे नाव सदाचार.
0female
राजाने त्याला म्हटले, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही, तू मला सोडून का जात आहेस.
0female
तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे, मी तुला जाऊ देणार नाही.
0female
तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल.
0female
राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला.
0female
सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.
0female
मुलांनो, सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे.
0female
जीवनात सदाचार, नीतीमत्ता, धर्माचरण, आदी नसेल, तर दान, लक्ष्मी, श्रीमंती, आदींचा काहीच उपयोग नाही.
0female
एक राजा खूप मोठा देवभक्त होता.
0female
गावात एक शंकराची पिंडी होती, त्याचा एक पुजारी होता.
0female
तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा.
0female
त्याला मधून मधून देवदर्शन होत असे.
0female
राजा रोज देवळात जायचा, देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा, देवासाठी दानधर्म करायचा.
0female
राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का होत नाही.
0female
पुजारी तर देवाला काहीच देत नाही, तरी त्याला देव कसा दर्शन देतो.
0female
एके दिवशी राजा देवळात गेला असतांना पुजारी पूजा करत होता, तेवढ्यात थोडा भूकंप झाला.
0female
देवळाच्या भिंती आणि छप्पर हलू लागले.
0female
पुजारी पिंडीवर ओणवा झाला; कारण छप्पर पडले, तर देवाला लागू नये.
0female
राजा लगेच पळून गेला, त्या वेळी पुजार्याला देवदर्शन का होते, हे राजाला समजले.
0female
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता.
0female
आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणाऱ्या भांडणांमुळे तो दु:खी होई.
0female
त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घड्यावर पाणी.
0female
एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एक-एक काठी घेऊन यायला सांगितले.
0female
त्याप्रमाणे ती मुले एक-एक काठी घेऊन आली.
0female
त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले.
0female
वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.
0female
पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले.
0female
पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या.
0female
वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली, आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली.
0female
पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी होती.
0female
आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना, एकीचे बळ किती असते ते ?
0female
वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले.
0female
तेव्हापासून ते एकजुटीने वागू लागले.
0female
एका गावात रथोत्सव चालू असतो.
0female
भाविक तो रथ एका गावातून दुसऱ्या गावात वाजत-गाजत नेत असतात.
0female
मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात.
0female
त्यांना प्रश्न पडतो, रथातील देवाला दुसऱ्या गावाला कसे पोहोचवायचे ?
0female
भाविक पर्यायी म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही.
0female
मार्गात मध्येच भाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते.
0female
सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात.
0female
रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात.
0female
उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्वजणदुसऱ्या गावाकडे प्रयाण करतात.
0female
काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात.
0female
काही वेळाने देवाला हार घालायला जागा राहात नाही.
0female
म्हणून लोक गाढवालाच भक्ती-भावाने हार घालू लागतात.
0female
मार्गाने जातांना गाढव विचार करते, आत्तापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे.
0female
देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे गाढव मानू लागले आणि त्यामुळे ते अधिकच आनंदी झाले.
0female
काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला.
0female
मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे.
0female
हा विचार आल्यावर ते स्वतःचे अंग झाडते, त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो.
0female
हे पाहून भाविक भडकतात आणि गाढवाला धोपटतात.
0female
जोपर्यंत आपल्यावर देवाची कृपा आहे, आपल्याजवळ त्याचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे.
0female
ज्या क्षणी अहंकार बळावतो, त्या वेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी राहत नाही.
0female
म्हणून देवाला विसरू नये, अहंरहित रहावे, सर्व मानसन्मान देवाचरणी अर्पण करावेत.
0female
एक माणूस परीस शोधायला निघाला.
0female
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा.
0female
असा त्याचा दिनक्रम सुरू झाला.
0female
दिवस गेले, महिने लोटले, वर्षे सरली, पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही.
0female
शेवटी तो माणूस म्हातारा झाला.
0female
ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता, त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले.
0female
ती साखळी सोन्याची झाली होती.
0female
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.
0female
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो.
0female
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहिणींच्या नात्याने, कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने, तर कधी प्रेयसीच्या नात्याने.
0female
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो, आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो.
0female
आपण जे काही असतो, किंवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो.
0female
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात.
0female
मुंबई कधीही न झोपणार शहर, पण इथे सुद्धा मनमोहक सकाळ रोज होते बर का!
0female
अशीच सकाळची वेळ होती, सुर्यदेवांची कोवळी किरणे अलगद शरीरास स्पर्श करून जात होती.
0female
काल रात्री एका मित्राने सकाळी भेटण्याचं वचन माझ्याकडून घेतल होत, त्यालाच भेटण्यासाठी म्हणून मी घराबाहेर पडलो.
0female
ठरल्या ठिकाणी अगदी वेळेच्या आधीच पोचायची माझी सवयच होती.
0female
साधारण साडे नऊ ची वेळ असावी.
0female
ह्या अनोळखींच्या जगात तिथे मी एकटाच होतो जो प्रत्येक येणाऱ्या, जाणाऱ्यांकडे टक लाऊन पाहत होतो.
0female
मिनिटाला शंभर पावल, असा इथे नियम असतो, हे वाक्य खरच आहे, हे त्या दिवशी मी प्रत्यक्ष अनुभवलं.
0female
तितक्यात काही पावलं, माझ्या दिशेने दबकत येताना जाणवली.
0female
पण मागे वळून पाहण्याच्या अगोदरच, कोणीतरी माघून डोळे गच्च पकडले.
0female
अनेकांची नावं घेतली, पण नकारार्थी हुंकार कानावर पडले.
0female
डोळ्यांवरचा हाथ अलगद सरकला, ती व्यक्ती दृष्टीक्षेपात आली.
0female
ती होती सतरा ते अठरा दरम्यान रेंगाळत असलेली एक तरुणी, जीला मी पहिल्यांदाच पाहत होतो.
0female
मी काही बोलण्याचा अगोदरच ती उत्साहाने बोलली.
0female
पण तिच्या चाललेल्या बऱ्याच वेळेच्या बडबडीत एक गोष्ट उमजली.
0female
अगदी योगायोगाने मी त्या दिवशी त्याच पोशाखात तिथे पोहोचलो होतो.
0female
तिला बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलू देईनाच.
0female
ती काय बोलत होती ह्याकडे माझ पूर्ण लक्ष होत.
0female
शेवटी मला कॉलेज ला उशीर होतोय, आपण उद्या पुन्हा इथेच भेटू अस बोलून ती निघून गेली.
0female
प्रत्यक्ष दहा मिनिटं माझ्या पुढे उभी राहून मला एकही शब्द बोलू न देणाऱ्या त्या अनोळखी मुलीला.
0female
तिच्या होणाऱ्या गैरसमजाबद्दल उद्या नक्की सांगू असा निश्चय करून, मी त्या विचारांना स्वल्पविराम दिला.
0female
ज्याला भेटायला आलो तो अजून आला नाही म्हणून मी त्याला फोन लावला.
0female
त्याचाशी बोलत असतानाच अचानक खांद्यावर भक्कम अशी थाप पडली.
0female